हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपनेते तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनातं राज्य सरकारवर टीकास्त्र डागले. या ठिकाणी केलेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला असून गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, असे म्हंटले आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे राज्य सरकारला इशारा दिला असून गुन्हे दाखल केल्या प्रकरणी सवालही उपस्थित केले आहेत. खासदार संभाजीराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा ! सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ?,” असा सवाल उपस्थित केला आहे.
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !
सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?
समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत.
राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ? pic.twitter.com/y7uuqtA8Vq
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 21, 2021
मराठा आरक्षणप्रश्नी केलेल्या आंदोलनप्रश्नी पोलिसांकडून गुन्हे दाखल केले असल्याने आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे. एकिकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे घेतले जात असून त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले जात नाहीत. आणि मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन केले तर गुन्हे का दाखल केले जातात? असा सवालही संभाजीराजेंनी केला आहे.