राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल- सुधीर मुनगंटीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हवाई प्रवासाला परवागनी नाकारल्याने राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादाने आता कळस गाठल्याचे चित्र आहे. राज्यपालांना राज्य सरकारने हवाई प्रवासाची अनुमती न दिल्यानं त्यांना विमानातून उतरुन राजभवानावर परतावं लागलं. राज्यपालपदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारी विमानाने उत्तराखंडला निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाने अनुमती दिली नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment