दुर्देवाने राहुल गांधींच्या वागण्यात-बोलण्यात कुठलीच मॅच्युरिटी दिसत नाही; विनोद तावडेंची टीका

Vinod Tawde Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या कारवाईबाबत भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली असून दुर्देवाने राहुल गांधी यांच्या वागण्यात व बोलण्यात कुठलीच मॅच्युरिटी दिसत नाही, अशी टीका तावडे यांनी केली.

भाजप नेते विनोद तावडे यांनी कराड येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेससारख्या पक्षातील राहुल गांधींसारखे नेते कोर्टाचा निर्णय मी मानणार नाही असे म्हणत आहेत. मात्र जे नियमात आहे जे घटनेत आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होत आहे. जर ते नाही केलं तर घटनेचं पालन करत नाही म्हणून सर्वजण बोलायला लागत आहेत. आणि घटनेचं पालन केलं तर पालन केलं असं म्हणत आहेत. विरोधक एकत्रित आहेत हे तर वास्तव आहेच परंतु त्यापेक्षा काँग्रेसचे राहुलजी सारखे नेते कोर्टाचा निर्णय मी मानणार नाही असे म्हणतात.

https://www.facebook.com/watch/?v=900313174541164&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing

एखाद्या जातीच्या विरोधात इतकं निंदनीय वक्तव्य कस काय ते बोलू शकतात. राजकीय जो समजुदारदारपणा दिसत आहे तो राहुल गांधी यांच्यात कुठेच दिसत नाही. आणि त्याप्रमाणे विरोधक समाजविरोधक गोष्टी बोलत आहेत. विदेशात जाऊन भारताच्या विरोधात वक्तव्य करणं. ज्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांना अटक केल्यानंतर त्यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर मी भारतात जाऊन बोलेन असे म्हणाल्या.

एका सभेने हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होणार नाही; विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला

यावेळी विनोद तावडे यांनी मनसे भाजप युतीबाबत प्रतिक्रिया दिली. मनसे आणि भाजप यांची युती होईल असं सध्या तरी वाटत नाही. त्याचबरोबर एखाद्या सभेने मतांचे ध्रुवीकरण होणार नाही. अनेक वर्ष भाजप हिंदुत्वाचा मुद्दा घेत आहे आणि त्यामुळेच कोणाचं हिंदुत्व पक्का आहे हे सर्वांना माहीत असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.