हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक मध्ये शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिला असून भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं यावेळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.” शिवसेनेचा हा कुठलाही मास्टर प्लान नाही तर आता प्रवाह बदलोय, हवा बदलतेय अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे. गिते व बागुल यांच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’