नवाब मलिक दाऊदचा हस्तक, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; भाजप आक्रमक

0
99
nawab malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ति कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. नवाब मलिक म्हणजे दाऊद इब्राहिम चा गुलाम आहे अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मालिकांवर निशाणा साधला. तसेच मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली.

“शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेण्यात आल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे,” असा दावाही भंडारी यांनी केला आहे.

राज्यातील सरकार दहशतवाद्याविरोधात नाही तर त्यांना संरक्षण देणारे हे सरकार आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा असे माधव भंडारी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here