राज्यातील ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करते, एक… आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई । ”राज्यातील ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करते. बॉलिवूड मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. ते बॉलिवूडची चिंता करतात आणि सुपुत्र पब आणि बारची चिंता करतात, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे. पुण्याच्या कोरोना आकडेवारीबाबत मी सांगण्याची गरज नाही. पब, बार आणि रेस्टॉरंट नियम घालून उघडली जाऊ शकतात तर योग्य  नियम घालून मंदिरं का उघडली जाऊ शकतात? कोणीही मागणी करत नसताना पब, रेस्टॉरंटची वेळ का उघडली? असे सवाल आशिष शेलार यांनी केले.

याशिवाय, शाळा सुरू करण्याबाबत सरकारने संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे. राज्य सरकारने त्या शाळा सुरू करण्याची तारीख दिली. ती देताना जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठकही घेतली नाही. शिक्षकांचेही प्रश्न आहेत. सरकार आहे की छळावणुकीचे केंद्र आहे? असा सवाल करत सरकारने सर्व घटकांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावी, असे आशिष शेलार म्हणाले. राज्यातील ठाकरे सरकारने वर्षभरात जी दयनीय अवस्था केली आहे. त्याविरोधात मतदारांनी कौल द्यावा. इतकं पळकुटे आणि पराधीन सरकार यापूर्वी कधी बघितले नाही. जनतेच्या प्रश्नावर मंत्री पळ काढतात किंवा पराधीन आहोत, असे उत्तर देतात, असं सांगत आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकावर निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेचा जाहीर निषेध करतो. महाआघाडीचा एक नेता म्हणाला, ‘मतदारांशी संभाळून बोला ते रेकॉर्ड करतील’. अशाप्रकारे मतदारांवर अविश्वास दाखवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, असंही आशिष शेलार यांनी सांगितले. सरकारने राज्यपालांकडे 12 नावे दिले आहेत. राज्यपालांना लिखित अलिटीमेंटम कसे देता येईल? हा शब्दच मान्य नाही. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे नसली तरी आम्ही काम एकत्रित करतो, सामूहिक करतो. माझ्याशी चर्चा करून निर्णय घेतला, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like