हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीका केली जाते. पडळकरांनी नुकतीच बैलगाडा शर्यतींवरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. “राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांनी
छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. नाकाबंदी करायला काय? तालीबानी येणार आहेत का? असा सवाल पडळकरांनी राष्ट्रवादीला विचारला आहे.
बैलगाडा शर्यतींवरून भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, “राष्ट्रवादीची बैलगाडा शर्यतीबद्दलची दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका आता शेतकऱ्यांसमोर उघडी पडत आहे. भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख आणि महाराष्ट्राची शान असलेल्या बैलगाडा छकडा शर्यती नामशेष करण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादी करत आहे.
#राष्ट्रवादी_कॉंग्रेसच्या लोकांनी
सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर बैठका घेऊन असे भासवले की छकडा शर्यतीला विरोध नाही. आणि आता हे गृहखात्याच्या बळाचा वापर करून #छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत, नाकाबंदी करायला काय #तालीबानी येणार आहेत का? pic.twitter.com/EpLF3S98oP— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 17, 2021
बैलगाडा छकडा शर्यतीचे कपटाने नामोनिशाण मिटवण्यासाठी हे राष्ट्रवादीचे लोक निघाले आहेत. यांना मागील दोन वर्षांपासून ना तारीख काढता आली, ना अध्यादेश काढता आला. जेव्हा मी स्पर्धेचे आयोजन केले, तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन अशा प्रकारे भासवले की, आमचा छकडा शर्यतीला विरोध नाही.” मात्र, आता वेगळीच परिस्थिती दिसत आहे.