वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून नेहमीच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला जातो. आज त्यांनी महाज्योती संस्था ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या मुद्यावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करतीये. ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत., असे पडलकरांनी म्हंटले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि महाज्योती संस्थेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सारथी आणि बार्टीकडून प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योतीमात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करतीये. ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असा सवालही पडळकर यांनी विचारला आहे.

यावेळी पडळकर म्हणाले की, वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोल आणि हसं या प्रस्थापितांच्या सरकारनं करुन ठेवले आहे. ‘बड्या बड्या बाता आणि धोरण खातंय लाथा’ अशी वडेट्टीवार यांची गत झालीय. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार यांचे धोरण आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

Leave a Comment