व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजप आ. जयकुमार गोरेंना रूग्णालयातून डिस्चार्ज

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांना आज पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 12-13 दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सातारा जिल्ह्यातील मलठण (ता. फलटण) येथे त्याचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आज 5 जानेवारी रोजी सकाळी त्यांना डाॅक्टरांनी डिस्जार्च दिला आहे. हेलिकॅप्टरने आ. जयकुमार गोरे पुण्याहून आपल्या मूळगावी बोराटवाडी (ता. माण) कडे रवाना झाले.

आ. जयकुमार गोरे यांचा 24 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. पुणे- पंढरपूर मार्गावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळील पुलावरून जवळपास 30 फूट चारचाकी गाडी खोल खड्ड्यात कोसळली होती. त्यानंतर त्यांना बारामती व नंतर पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. या अपघातात अंगरक्षक, गाडी ड्रायव्हर गंभीर जखमी झाले होते.

आज रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे उपचार केला. त्याबद्दल त्या सर्वांचे आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले. तत्पूर्वी आज सकाळी देशाचे रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज पुण्यातील रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या अपघातातील जखमी रुपेश साळुंखे याची रुबी रुग्णालयात ट्रीटमेंट चालू आहे. काल आ. जयकुमार गोरे यांनी रुपेशची भेट घेतली. त्याच्या तब्येतीची विचारपूस केली.