भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला पुन्हा अपघात

Jaykumar Gore
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले व असून या गाडीत आमदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते बसले होते.

म्हसवड येथे इफ्तार पार्टीसाठी भाजप आ. जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या गाडीतून (MH11 CZ 100) कार्यकर्तेही म्हसवडकडे निघाले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या गाड्यांचा ताफा गोंदवले बुद्रुक येथील मुख्य चौकात आला. त्यावेळी नेहमीप्रमाणे चौकात वाहतूक कोंडी झालेली होती. या कोंडीतून मार्ग काढून आ. गोरे पुढे गेले.

मात्र, त्यांच्या गाडीला लागूनच असलेल्या दुसऱ्या गाडीला मुंबईकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. गर्दीत समोरासमोर आलेल्या वाहनांमुळे रस्ता रिकामा करण्यासाठी ट्रॅव्हल्स मागे घेताना गोरेंच्या गाडीच्या पुढील दारावर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, गोरेंचे वाहन काही फूट ढकलत गेले. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ मात्र टळला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.