संजय राऊत राष्ट्रवादीचा भोंगा, त्यांना किती महत्त्व द्यायचे ते…; राणेंचा टोला

rane raut pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून भाजप आणि मनसेने आवाज उठवला आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीचा भोंगा आहे असा तोच त्यांनी लगावला तसेच या भोंग्याला किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरवा असेना नितेश राणे यांनी म्हंटल

नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की ,संजय राऊत सारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व दिले पाहिजे हे आपल्याला कळाले पाहिजे. सुरुवातीला २०१४ मध्ये राऊतांना ईडीच्या सर्व कारवाया योग्य वाटत होत्या आज जेव्हा त्यांच्यावर कारवाई होते ते भ्रष्टाचार करण्यामागे पूर्ण गुंतले आहेत. आता प्रवीण राऊतांविरोधात चार्जशीट तयार झाली आहे. त्यामुळे हा भोंगा असाच वाजत राहणार, या राष्ट्रवादीच्या भोंग्याचा आवाज ऐकायचा का हे आपण ठरवायचे.

दरम्यान, ठाकरे सरकार कडून महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांना अडकवण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेला गृहखाते पाहिजे आहे. प्रवीण दरेकरांवर कारवाई होत आहे हा त्याचाच एक भाग आहे, असा दावा त्यांनी केला. प्रवीण दरेकरांची चौकशी ही कुणाच्यातरी आदेशावर होते. नाहक त्रास देणं, विरोधकांचा आवाज दाबणं हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. पण आम्ही सर्व दरेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असेही नितेश राणे यांनी म्हंटल