मुंबई । लॉकडाऊन काळातील वीज बिलाच्या मुद्द्यावर भाजप आमदार नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार होणार’ अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
या महाविकास आघाडी सरकारने "NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते..
विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..
आणि मग..
Penguin Gang ची पार्टी सुरु!!!— nitesh rane (@NiteshNRane) November 19, 2020
सगळीकडे अंधारच अंधार झाला की Penguin Gang ची पार्टी सुरू असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढलाय. यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर नितेश राणेंच्या या ट्वीटला आघाडी सरकार कसं उत्तर देणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे. (bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government) (Electricity bill)
ठाकरे सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची मोहर! CBI ला परवानगीशिवाय कोणत्याही राज्यात प्रवेश नाही
वाचा सविस्तर-👉 https://t.co/p0923JhUix@cbic_india @CMOMaharashtra #HelloMaharashtra @PMOIndia— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 19, 2020
फडणवीसांचं मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण… – जयंत पाटील
वाचा सविस्तर-👉 https://t.co/kxJUvKq4Tb@Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSena @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 19, 2020
परिवहन विभागाला एका मिनिटात हजार कोटी दिलेत; मग वीजबिल माफीसाठी का नाही?; बावनकुळेंचा सवाल
वाचा सविस्तर-👉 https://t.co/NbmK0mkpWL@cbawankule @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @NitinRaut_INC #electricitybill— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 19, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in