महाविकास आघाडी सरकारने मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले आहे; नितेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवरती अनेकवेळा भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “उद्या अधिवेशनात भाजपचे 106 आमदार साथीने महाराष्ट्राच्या हितासाठी नक्कीच लढताना दिसणार आहेत. कुठेही सरकार अस्तित्वातच दिसत नाही. या सरकारने मिस्टर इंडिया चे घड्याळ घातले असंच वाटतंय कारण कारण गायब झालेले सरकार कुठेही दिसत नाहीये, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्हाला मुळातच आव्हान नाही. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपापसांत लढत आहेत. राज्यात सत्तेसाठी एकत्र येतात. मात्र, स्थानिक पातळीवर ती एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. महाविकास आघाडीचा स्वतःवरती विश्वास नाही मग जनतेने का ठेवावा?

नितेश राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीवरून शिवसेनेला आव्हान दिले. यावेळी ते म्हणाले कि, नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वतःच्या हिमतीवरती शिवसेना निवडून येण्याची ताकद नाही. शिवसेनेने स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊन दाखवावे. जोडतोड करून सत्ता घेण्याचा शिवसेना प्रयत्न करते. एकटे निवडून येण्याची क्षमता नाही म्हणून भाजप विरुद्ध एकत्र येऊन ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे यातच भाजपचा विजय झालेला आहे.