जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या नसात मुस्लिमांचे रक्त; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या नसात मुस्लिमांचे रक्त आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेश येथील भाजप आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. एका जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी असे विधान केलं आहे

राघवेंद्र प्रताप सिंह म्हणाले, जो हिंदू दुसरीकडे कुठेतरी जात असेल तर त्याच्या नसात ‘मियां’चे रक्त वाहत आहे . तो जयचंदचा देशद्रोही आणि हरामखोर मुलगा आहे. एवढा छळ करून हिंदू दुसऱ्या बाजूला गेला तर त्याने तोंड दाखवू नये. तुमच्यापैकी जयचंद किती आहेत? मला त्यांची नावे द्या आणि ते हिंदू आहेत की मियां आहेत हे पाहण्यासाठी मी त्यांच्या रक्ताची चाचणी घेईन. मी त्याची डीएनए चाचणी करून घेईन

दरम्यान, सिंह यांनी त्यांच्या वक्तव्याची इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कबुली दिली. पुढे स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, “मी त्या गोष्टी बोलल्या आहेत, मी नाकारत नाही. पण मी त्या सर्व गोष्टी दुसर्‍या संदर्भात बोललो होतो आणि भूतकाळाशी तुलना करत होतो. कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता. डोमरियागंजमध्ये सुमारे १.७३ लाख मुस्लिम मतदार आहेत, अशा ठिकाणी अशी धमकी देऊन कोणी निवडणूक जिंकू शकते का?,” असंही ते म्हणाले.