सातारा । सातारा जिल्ह्याच्या राजकीय दृष्टीकोनातून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत विजयासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. या निवडणुकीच्या निकालावर भाजपचे नेते तथा आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची अशी निवडणूक हि सातारा जिल्हा बँकेची मानली जाते. या निवडणुकीत ज्या ज्या विकास सेवा सोसायट्या या त्या त्या तालुक्याचे विषय आहेत. त्या त्या ठिकाणी निवडणुका या लढवल्या जातात. आमचे सर्व उमेदवार हे मोठ्या मतांनी निवडून आले आहेत,”असे भोसले यांनी म्हंटले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. जिल्ह्यातील राजकीय घडामोडीबाबत सांगायचे झालेतर विकास सेवा सोसायटी हे विषय त्या त्या तालुक्यापुरते महत्वाचे मानले जातात. त्या त्या तालुक्यातील उमेदवार हे त्यांच्या पातळीवर निवडणूक हि लढवत असतात.
यावेळी त्यांना माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर जी दगडफेक करण्यात आली. त्याबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर जी दगडफेक झाली त्याबद्दल आप्ल्याला काहीच माहिती नसून याबाबात आपल्याला काहीच बोलायचे नाही, असे शिवेंद्रसिहराजे भोसले म्हणाले.