Wednesday, October 5, 2022

Buy now

भाजप आमदार विजय राहंगडाले यांनी लुटला संगीत खुर्चीचा आनंद !!!

गोंदिया | हॅलो महाराष्ट्र | BJP MLA Vijay Rahangdale : राजकारण म्हंटले कि खुर्चीला खूप डिमांड असते. ह्या खुर्चीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. यावेळी गोंदियाच्या तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय राहंगडाले यांनाही खुर्चीचा मोह आवरत नसल्याचे पाहायला मिळाले. पण ही खुर्ची राजकीय नाही तर संगीतखुर्चीच्या खेळातील आहे. आमदार विजय राहंगडाले इलमाकोट इथल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी त्या कार्यक्रमात संगीतखुर्चीचा आनंद घेतला.

इलमाकोट येथे मुख्याध्यापक राजू चामट यांचा सेवानिवृत्तिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात संगीतखुर्चीचाही समावेश होता. संगीतखुर्चीचा खेळ पाहून आमदार विजय राहंगडाले हे देखील या खेळात सहभागी झाले. राजकारण खुर्ची महत्वाची मानली जाते आणि ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण घिरट्या घालत असतो आणि संधी साधत खुर्चीवर आरुढही होत असतो. असंच काहीसं राहंगडाले यांनी संगीतखुर्चीत दाखवुन दिले. त्यांचा पदाधिकाऱ्यांसोबत संगीतखुर्ची खेळतानाचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे. BJP MLA Vijay Rahangdale

 

 

या संगीतखुर्चीच्या खेळात गाणं सुरु झालं, आमदार महोदय आणि कार्यकर्ते खुर्चीभोवती फिरु लागले. दोन राऊंड पूर्ण झाल्यावर गाणं थांबलं आणि राहंगडाले यांनी अगदी मुत्सद्दीपणे खुर्चीचा ताबा मिळवला. त्यानंतर एक खुर्ची कमी करण्यात आली. पुन्हा गाणं वाजू लागलं, पुन्हा गोल राऊंड सुरु झाला. त्यावेळी राहंगडाले हे काहिसे संभ्रमित झाले. पण लगेच सावरत ते पुढे चालू लागले. पुन्हा एकदा गाणं वाजायचं थांबलं आणि आमदार महोदयांनी जवळजवळ उडी घेतच खुर्चीचा ताबा मिळवला. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. BJP MLA Vijay Rahangdale

हे पण वाचा :

यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक मोठा नेता पडणार ; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

मी जर ती सीडी बाहेर काढली तर महाराष्ट्र हादरेल ; करुणा शर्मांचा धनंजय मुडेंना इशारा

एकनाथ खडसेंना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुखांविरोधात सर्व माहिती देण्यास तयार

गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल