राज ठाकरे उंदीर आहे; भाजप नेत्याची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच उत्तरप्रदेश येथील भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध करत राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे हे दबंग नेते नसून उंदीर आहे अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत.’राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर केलेल्या अत्याचारांबाबत माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाहीतर आम्ही त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. आम्ही त्यांना इतका विरोध करू की ते आयुष्यात कधीही अयोध्येत पाय ठेवू शकणार नाही. आम्हाला मराठ्यांचा विरोध नाही. मराठे अयोध्येत आले तर आम्ही त्यांचं जंगी स्वागत करू. पण आमचा विरोध फक्त राज ठाकरेंना आहे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढली आहे. एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनी आपल्या भाषणात राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं होत. त्यामुळे उत्तरप्रदेश भाजप नेत्यानेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.