Monday, February 6, 2023

देशाची लोकसंख्या वाढवण्यास आमिर खानसारख्या लोकांचा हात; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी सरकारने नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण आणले आहे. याच वेळी भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांनी अभिनेता अमीर खान याच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. देशाची लोकसंख्या वाढवण्यास आमीर खानसारखे लोक कारणीभूत असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला

देशाची लोकसंख्या अनियंत्रित होण्यात आमिर खानसारख्या लोकांचं हात आहे आणि हे देशाचं दुर्दैव आहे, असं गुप्ता म्हणाले. ‘आमिर खानला पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी पत्नी किरण राव मुलांसोबत कुठे भटकणार याची चिंता नाही. पण आमिरनं तिसरीचा शोध सुरू केला आहे. एका हिरोचा हा संदेश आहे का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

अमीर खान सारखी बेशरम लोक महिलांना मुले जन्माला घालण्याचे मशीन समजतात असेही त्यांनी म्हंटल. दरम्यान अमीर खान याने काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर अमीर खानवर काही नेटकरी टीकाही करत आहेत पण सुधीर गुप्ता यांच्या वक्तव्य नंतर नवा वाद होण्याची शक्यता आहे