सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाला उदयनराजे जेव्हा टुव्हीलरवरून गेले. त्यांच्या प्रकारावरून शिवेंद्रराजे यांनी टीकाही केली होती. त्यांच्या टीकेला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “साताऱ्यात कुठे कसे जायचे हे माझे मी ठरवेल. विकास कामांच्या उद्घाटनासाठी मी लोळत जाईल .. गडगडत जाईल … अथवा दंडवत घालत जाईल याचे तुम्हाला काय करायचे आहे? असे उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रतापगड येथील भवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीका केली. “मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो, मी चालत ही जाईन, रांगत ही जाईन, वाटले तर लोळत ही जाईन नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडतही जाईल, सीट वर उभा राहून जाईल नाहीतर डोक्यावर चालत जाईन. तुम्हाला काय करायचेय? मी कसाही जाईन, असे उदयनराजे प्रत्युत्तर देताना यांनी म्हंटले आहे.
भाजप पक्षातील या दिनही राजेमध्ये सध्या चांगलाच वाद रंगला आहे. आता तर उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे त्यांच्या या प्रत्युत्तराची चांगलीच चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आजच्या विधानावरून दोम्ही राजेमधील नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.