सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील आंबळे येथे नुकत्याच झालेल्या एका सभेत खा. उदयनराजे भोसले यांनी तलवार हातात घेऊन फिरवली. आणि भाषणावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना नाव न घेता इशारा दिला. “जे लोक तंबी देण्याचं काम करत आहेत. जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका. काही लोकांना असं वाटतं की हा भाग हा परिसर म्हणजे माझाय, मला हसू येत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुध्दा मनात कधी असं आले नसेल की हे माझं. ते नेहमी म्हणायचे समाजामुळे मी आहे, माझ्यामुळे समाज नाही, असा इशारा उदयनराजेंनी दिला.
खासदार उदयनराजे बसोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबळे येथे नुकतीच एक सभा पार पडली. यावेळी सभेला उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने जलोषात स्वागतही करण्यात आले. यावेळी स्टेजवर जाताच उदयनराजेंनी हातात तलवार घेत सर्वांसमोर ती म्यानातून बाहेर काढली. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, कार्यकर्त्यांनो एकच खात्री बाळगा कि जे तंबी देण्याचे काम करतात. त्यांना अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षात मी सांगतो की, तुम्हाला जर तुमचे हित कळत असेल तर वाकड्या नजरेने दुसऱ्या कोणाकडे बघू नका.
भरसभेत तलवार फिरवत उदयनराजे भोसलेंचा शिवेद्रराजेंना इशारा; म्हणाले कि… pic.twitter.com/eSjWawxtpu
— santosh gurav (@santosh29590931) April 10, 2023
हा कार्यक्रम घेत असताना काही लोकांना असं वाटतं कि हा भाग, हा परिसर माझा आहे. असू देत पण साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा कधी मनात असला विचार कधी आणला नाही. पण काही लोक अशी असतात की, 2012 साली एक चूक झाली. मी तेव्हा प्रचाराला गेलो, मनोमिलन होते . वाटलं नव्हतं स्वार्थ साधला गेला की काही लोक जसा सरडा रंग बदलतो तशी काही लोकांची खासियत असते, अशी टीका नाव न घेता उदयनराजेंनी शिवेद्रराजेंवर केली.