हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळावा दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा नारायण राणेंनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणवतात, वाघ पिंजऱ्यातला की पिंजऱ्याबाहेरचा? असा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. मोदींच्या नावावर निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांसोबत हातमिळवणी केली ही भूमिका वाघासारखी नसून गांडुळासारखी झाली. या मुख्यमंत्र्यांना अधिकारीही हसतात. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
पुढील निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे 10-15 आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा नारायण राणे यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नावावरच शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. अन्यथा शिवसेनेचे 25 आमदारही जिंकले नसते, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणजे दिशाभूल करणारे, थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. मराठ्यांना आरक्षण हा माणूस कधीही देऊ शकत नाही कारण मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हंटल आहे.
संजय राऊत महाराष्ट्रातील सरकार पाडून दाखवा, असे सांगतात. मात्र, हे सरकार पाडण्याची गरजच नाही, ते आपोआप पडेल. संजय राऊत म्हणजे विदुषक आहे. संजय राऊत ‘सामना’त म्हणतात आम्ही 5 वर्षे पूर्ण करणार, मात्र यांच्याकडे आमदार किती आहेत? संजय राऊत विदुषक आहेl. शिवसेना 25 वर्ष सत्तेत म्हणतात. हे कोणत्या नशेत आहेत? शिवसैनिकांची कामे होत नाहीत. शिवसेनेच्या आमदार- खासदारांना कुणी विचारत नाही. शिवसेनेत असंतोष आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’