हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी आज केंद्रातील आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत असताना पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही अस म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नारायण राणे म्हणाले, माझं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केलं, चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी फोन करुन अभिनंदनही केलं आणि चांगलं काम करा म्हणून शुभेच्छाही दिल्या पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या मनाचा नाही अस म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. राणेंना दिलेल्या खात्यावरून संजय राऊतांनी डिवचले होतं. त्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. कोणतेही खाते बरे किंवा वाईट नसते तर त्यासाठी काम करणे महत्त्वाचे असते अस म्हणत त्यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.