हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाली. दरम्यान या घटनेनंतर सर्व राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे सुरू केल्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेने आज सामना अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर टीकास्त्र सोडल्या नंतर आता राणेंनी देखील शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे.
जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामना मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच ‘सामना’मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते,” असा टोला लगावला आहे.
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू,” असा टोला लगावला आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेल्याच्या पार्श्वभूमीवर हा टोला राणेंनी लगावलाय.