वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा; नारायण राणेंकडून सरकारचे वाभाडे

Narayan rane uddhav thackrey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच दरम्यान कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार कडून एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. सचिन वाझेच्या वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

राज्यात फक्त वसुलीचा धंदा सुरू आहे. सचिन वाझेला मुंबईतून 100 कोटी जमा करायला सांगितले. हे आदेश फक्त अनिल देशमुखांचे नाहीत. राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांचे हे आदेश आहेत. मग तुम्ही हे जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत? ते पैसे कुठे जातात? कुणाकडे जातात? असा सवाल राणेंनी केला.

जसी माझे कुटुंब माझी जबाबदारी, महाराष्ट्र जर तुमचं कुटुंब असेल तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं, रुग्णांवर योग्यरित्या उपचार करणं, त्यांना ठणठणीत करणं ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात का जाऊन बसताय? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही. कोरोना होईल कसा? जो व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही. तो व्यक्ती महाराष्ट्राला कसं सांभाळणार? असा सवाल करत राणेंनी ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group