सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पाटण तहसीलदार कार्यालय समोर सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या बेमुदत साखळी ठिय्या आंदोलनाला अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आमदारांची संयुक्त बैठक अधिवेशनापूर्वी मुंबईत घेण्यात येणार असून अधिवेशनात पहिल्या दिवसापासून आरक्षण मागणीचा प्रश्न लावून धरला जाणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली
राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. कृपया करून मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. जर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात अशा प्रकारे उपोषणाला सुरुवात झाली तर सरकार मधील आमदाराना आणि मंत्र्यांना लोक फिरू देणार नाहीत ही त्यांनी काळजी घ्यावी असा इशारा देखील नरेंद्र पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की लवकरच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य युक्तिवाद करून मराठा आरक्षण टिकवावे आणि ज्या सवलती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या त्या सवलती सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू कराव्यात अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’