हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी सरकार कडून निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिले आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी दरवर्षी प्रमाणे महाराजांच्या मंदिरात अभिषेक करणार आहे. मोठ्या संख्येने माझ्या सोबत शिवभक्त असतील… असेल हिंमत तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं. अस निलेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी दरवर्षी प्रमाणे महाराजांच्या मंदिरात अभिषेक करणार आहे. मोठ्या संख्येने माझ्या सोबत शिवभक्त असतील… असेल हिंमत तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2021
यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का? असा सवाल करताना वेळीच हि नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका.”असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’