हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सध्या आयकर विभागाच्या रडारावर आहेत. त्याच दरम्यान, त्यांच्या डायरीत मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ आणि 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख समोर आला आहे. दरम्यान, मातोश्री म्हणजे आपली आई आहे अस स्पष्टीकरण जाधव यांनी दिले असले तरी विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली आहे. मातोश्री वाल्यांना पैसे आणि गिफ्ट द्याल तरच पदं मिळतात हे परत एकदा सिद्ध झालं. ठाकरे कुटुंब तुरूंगात गेले पाहिजे तेव्हाच कळेल हे सगळे पैसे जमा करून ठेवले आहेत ती गुफा कुठे आहे. २५ वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे.असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
मातोश्री वाल्यांना पैसे आणि गिफ्ट द्याल तरच पदं मिळतात हे परत एकदा सिद्ध झालं. ठाकरे कुटुंब तुरूंगात गेले पाहिजे तेव्हाच कळेल हे सगळे पैसे जमा करून ठेवले आहेत ती गुफा कुठे आहे. २५ वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे. pic.twitter.com/XRjLJ9v7VI
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 27, 2022
नेमकं काय आहे प्रकरण-
यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ आणि 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव देखील मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, मातोश्री म्हणजे आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.