धनंजय मुंडेंकडून हीच अपेक्षा; निलेश राणेंची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी  हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील मुंडेंवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. त्याच मराठवाड्यातील बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे ऐन दिवाळीत डान्सर नाचवतायत. मंत्री मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. एसटी संप सुरू आहे आणि हे मात्र नाच गाणं करण्यात मग्न आहेत असा टोला फडणवीस यांनी लगावला तसेच सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करु शकतं हा प्रयत्न तुम्ही करा,’ असंही ते म्हणाले.

Leave a Comment