‘त्या’ सगळ्या बाटल्या संज्यानेच रिकाम्या केल्या; राणेंची राऊतांवर टीका

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्यानंतर राज्यात राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

याचा अर्थ ठाकरे सरकार आल्यापासून मंत्रालयाची आतून साफसफाई दीड वर्षांनी झाली नाही की काय? संज्या राऊतचं हे वक्तव्य बघून असं वाटतं त्या सगळ्या बाटल्या संज्यानेच रिकाम्या केल्या आणि नशेत मीडियासमोर आला कारण रिकाम्या बाटल्या तपासायचं लॅब असतं हे आज कळलं.’ अस म्हणत निलेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here