रामदास कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका; राणेंची सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब शिवसेना पोखरत असल्याचाही आरोप देखील त्यांनी केला. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. रामदास कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे, असे ते म्हणाले

निलेश राणे म्हणाले, रामदास कदम यांनी राणेंवर टीका करण्याचं काम केलं कारण त्यांना मातोश्रीतून बक्षीस हवे होतं. त्यांनी ते विरोधी पक्षनेते पद मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं आणि आज त्यांची शिवसेनेमधे ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली. असा शब्दात निलेश राणे यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय.

दरम्यान, अनिल परब यांना रामदास कदम यांच्या आरोपाबद्दल विचारले असता त्यांनी मला रामदास कदमांच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि पक्ष त्यावर बोलेल. मला यावर काहीही बोलायचं नाही”, असं म्हणत अधिक बोलण्यास टाळलं आहे..

Leave a Comment