हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी भागात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. परंतु उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
दरम्यान उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू असून कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा करत आहे. जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.