हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी पहायला मिळाली आहे. याप्रकरणी भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. अशातच आता सुशांत प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
नुकतंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला होता.
प्रियंका आणि मीतू यांनी ही तक्रार रद्द व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र हा गु.न्हा रद्द करण्यास मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. याप्रकरणी मुंबई हाय कोर्टात मुंबई पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रावरूनच निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावून पवार साहेबांनी नुस्त CBI ला डिवचलं नाही तर ह्या २ एजन्सी आपसात भिडले की शिवसेना टेन्शन मध्ये येईल त्यांना माहीत आहे. सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जात आहे.
मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र https://t.co/4NhW9yD1bA
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 3, 2020
मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावून पवार साहेबांनी नुस्त CBI ला डिवचलं नाही, तर ह्या २ एजन्सी आपसात भिडले की शिवसेना टेन्शन मध्ये येईल त्यांना माहीत आहे. सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जात आहे, असं निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राणे यांच्या या ट्वीटनंतर एकंच खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’