निलेश राणे कोरोनामुक्त ; ट्विट करुन दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदान निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. निलेश राणेंचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यांनी स्वतः याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. माझी करोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असं निलेश राणेंनी म्हटलंय.

१६ ऑगस्ट रोजी निलेश राणेंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यावेळीही त्यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती होती. अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर निलेश राणे तात्काळ आपल्या मुंबईतील घरात सेल्फ क्वारंटाइन झाले होते. याचसोबत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं.

Leave a Comment