इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार ; निलेश राणेंनी जयंत पाटलांवर केला पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार सक्षम असून यशस्वीपणे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आरोप करत सुटले आहे. नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोल्यात बोलताना टीका केली होती. पाटलांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार अशी जळजळीत टीका करत निलेश राणेंनी पलटवार केला आहे.

आता मंत्री जयंत पाटील यांच्या या टीकेला भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “राष्ट्रवादीचे इस्लामपूर मतदारसंघ मर्यादित नेते जयंत पाटीलाना स्वतःला सगळं समजतं असा गैरसमज आहे.

गंजलेल्या तोफा दुरुस्त होतात पण गंजलेले विचार दुरुस्त होत नाही. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार. तुमचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका” असा टोला निलेश राणे यांनी जयंत पाटलांना लगावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like