हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली. यापूर्वी भाजप मध्ये उपन्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे अशी टीका राऊतांनी केल्यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संज्या मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संज्या काय सांगतो अस ट्विट निलेश राणे यांनी केले.
शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संज्या मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संज्या काय सांगतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले-
भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.असे संजय राऊत यांनी म्हंटल होते