हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएच्या चौकशीखाली असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या सोबत शिवसेना नेते अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. अनिल परब यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत विखारी टीका केली आहे. ‘सचिन वाझेने सांगीतलं अनिल परब पण त्याच्यावर वसुलीसाठी दबाव टाकत होता. अनिल परब बंगल्यातला म्हणजे मातोश्रीचा जवळचा माणूस हे जगजाहीर आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणारच कारण उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा. स्पॉट नानाचे दिवस फिरले, खूप उड्या मारत होता,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
सचिन वाझेने सांगीतलं अनिल परब पण त्याच्यावर वसुलीसाठी दबाव टाकत होता. अनिल परब बंगल्यातला म्हणजे मातोश्रीचा जवळचा माणूस हे जगजाहीर आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणारच कारण उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा. स्पॉट नानाचे दिवस फिरले, खूप उड्या मारत होता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 7, 2021
परबांवर आरोप काय?
सचिन वाझे यांनी आज एनआयए कोर्टात एक पत्रं देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. परब यांनी मला जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मला बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता, असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page