जत्रेत जाऊन पाकीट माराल अन् सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो मी पाकीट नाही मारलं – राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अनिल परब यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्या वरील आरोपांचे खंडन केले. बाळासाहेब यांची शपथ घेऊन अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. दरम्यान भाजपने मात्र अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की कुत्र भीक घालत नाही तुझ्या शिवसैनिकांच्या शपथांवर. उद्या जत्रेत जाऊन पाकीट माराल आणि सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो पाकीट मी नाही मारलं तर पोलिसांनी सोडून द्यायचं का?? हीच शपथ कोर्टात घेतली तर जज हाथ पाय बांधून ६ महिन्याची पोलीस कस्टडी देतील. संज्या स्वतः बाईच्या लफड्यात अडकलाय.

अनिल परब नक्की काय म्हणाले-

दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment