Saturday, January 28, 2023

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घराचे वॉचमन आहेत का?; निलेश राणेंची घणाघाती टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्या घराची झडती घेताना सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्यतर देताना जयंत पाटील हे काय अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का असा सवाल केला.

जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत, असा टोला राणे यांनी लगावला.

- Advertisement -

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असं सांगतानाच राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही. उद्या आपलंही नाव येईल म्हणून राष्ट्रवादीवाले बिथरले आहेत असे निलेश राणे यांनी म्हंटल.

जयंत पाटील नक्की काय म्हणाले होते-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी यांनी सीबीआयच्या कारवाईवर शंका उपस्थित करत देशात मोघलाई आल्याचं वाटत असल्याची टीका केली आहे. ‘सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. धाड टाकल्यानंतर जे आक्षेपार्ह वाटलं असेल ते तिथेच जनतेसमोर आणायला हवं. प्राथमिक चौकशीचा निष्कर्ष कळण्याआधीच धाड घालुन आणि बाहेरचे सामान-वस्तू आत घेऊन जाण्याची घटना घडली आहे.’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.