संजय राऊत महाविकासआघाडीत घंटा आहे ; ‘त्या’ फोटोवरून निलेश राणेंनी उडवली खिल्ली

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी सर्व प्रमुख नेते, मंत्री हे सपत्नीक या कार्यक्रमासाठी हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा हजर होते.

मात्र, या कार्यक्रमास शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे मात्र उपस्थित नसल्याचं मंत्र्यांच्या ग्रुप फोटो वरून दिसत आहे. हाच धागा पकडून भाजप नेते निलेश राणे यांनी अतिशय विखारी भाषेत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करतानाच त्यांना या पार्टीसाठी आमंत्रण देखील दिलं नसल्याचे म्हणत खिल्ली उडवली आहे.

अजून एक गोष्ट या फोटोमध्ये जाणवली ती म्हणजे संज्या राऊतला या पार्टीत सुद्धा बोलवलं नाही. भावाला मंत्रीपद पण नाही व विकास आघाडीच्या कुठल्या कार्यक्रमाचे आमंत्रण पण नाही, संज्या फक्त सामना पेपर आणि मीडियासमोर ओकण्यासाठी. ईन शॉर्ट संज्या महाविकास आघाडीत घंटा आहे.’ अशी जहरी टीका राणेंनी केली आहे.

याआधी याच कार्यक्रमावर निलेश राणेंनी टीकास्त्र सोडलं होतं. देशासह राज्यातील शेतकरी नेते देखील रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत मात्र, दुसऱ्या बाजूला पंजाबचे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत म्हणून मोदी सरकारवर टीका करणारी महाविकासआघाडीची पार्टी जोरात चालू असल्याचे चित्र आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here