हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. बेळगाव मध्ये भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यातील तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार 642 मते मिळाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोर लावला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे स्वतः त्याठिकाणी प्रचाराला गेले होते. आता निवडणुकीत शुभम शेळके यांचा पराभव झाल्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे.
संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेने जे मुंबईत मराठी माणसासोबत केलं तेच बेळगावात केलं. एका तरुण मुलाला पराभवाच्या घशात ढकलला आणि मराठी माणसाची समिती कमजोर केली. आता पुढच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्याकडे बघणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेने जे मुंबईत मराठी माणसासोबत केलं तेच बेळगावात केलं. एका तरुण मुलाला पराभवाच्या घशात ढकलला आणि मराठी माणसाची समिती कमजोर केली. आता पुढच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्याकडे बघणार नाही असं ट्वीट त्यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.