हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं हातच पीक गेल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे
निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी. नुसतं बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशी टीका त्यांनी केली आहे.
ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा. pic.twitter.com/Q6X8eg85p9
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2020
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं दहा हजार कोटीचं पॅकेज
दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’