स्वतः पवारांचे लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना ..; राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

Nitesh Rane Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली. यापूर्वी भाजप मध्ये उपन्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे अशी टीका राऊतांनी केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे .

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. सचिन आहिर – bks ची जबाबदारी… राहुल कनाल – शिर्डी संस्था… आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था… उदय सामंत – कॅबिनेट मंत्री… अब्दुल सत्तार – मंत्री…. प्रियांका चतुर्वेदी – खासदार…

इथे डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदेंसारखे जुने सैनिक दिसणार नाहीत.. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.”