संजय राऊत आणि सिद्धू हे जुडवा भाऊ; नितेश राणेंचा टोला

Bjp nitesh rane criticism shivsena and sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू हे जुळे भाऊ आहेत असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत हे सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचे काम करत आहे, अशी शब्दात राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

नितेश राणे म्हणाले, पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू आणि आणि येथे संजय राऊत हे एकाच तालमीत बसणारे लोक आहेत. पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू जसं काँग्रेस संपवण्याचं काम करत आहेत, तसंच काम येथे संजय राऊत करत आहेत. संजय राऊत हे भाजपसाठी पोषक काम करत आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावलाय.

दरम्यान, मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुनही नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. कंत्राटदाराला भरमसाठ पैसे दिले जातात. मग स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग होते. मुख्यमंत्री इंजिनिअरला जबाबदार धरणार आणि त्यांच्यावर कारवाई करणार, अशी माहिती आम्हाला मिळतेय. मुख्यमंत्रांवर हिम्मत असेल तर मातोश्रीवर उठबस करणाऱ्या ठेकेदारांवर त्यांनी कारवाई करावी. आम्ही लवकरच या ठेकेदारांची माहिती समोर आणणार आहोत, असा दावाही नितेश राणेंनी केलाय.