संजय राऊत सारखी माणसे पैसे टाकले की मिळतात; राणेंची सडकून टीका

0
42
Bjp nitesh rane criticism shivsena and sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. आता नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात. त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. संजय राऊत नेमके शरद पवार यांचे आहेत की उद्धव ठाकरे यांचे त्यांना माहीत नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

नारायण राणेंना अटक राजकीय सुडबुद्धीतूनच होती. आता अनिल परबांना ईडीची नोटीस मिळाली तर लगेच किंकाळ्या सुरू झाल्या हे राजकीय सुडबुद्धीतून आहे. हे आमची सत्यनारायणाची पुजा घालतात आणि आम्ही केलं तर राजकीय सुडबुद्धी, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here