हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद आता उफाळून आला आहे. नुकतच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने भाजपने टीकेची झोड उठवली. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?, अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला.
आहो पक्षप्रमुख..
खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे..
नाहीतर "हो मी नामर्द आहे” असं तरी ?— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2020
अजान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा दाखल देत शिवसेनेला आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विसर पडलाय,अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. तर ओवेसींना पण लाजवेल अशी भूमिका शिवसेनेने घेतलीये, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’