एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ः खासदार इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे, राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. शालेय परीक्षा रद्द करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. लॉकडाऊनमुळे एमपीएससीचे राज्यभरातील सर्व क्लासेस, अभ्यासिका बंद आहेत. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मेस बंद असल्याने गैरसोय झाली आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे .

अशा परिस्थितीत येत्या ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी परीक्षा शक्य नाही . कोरोना झाल्यामुळे तसेच लॉकडाऊन सदृ्श्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावे लागेल. त्यामुळे त्यांचे शैक्षिणक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे . या सगळ्या गोष्टींचा विचार करून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी ट्विट्च्या माध्यमातून केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment