हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
नितेश राणे यांनी याबाबत ट्विट केलं की नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय..ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??
नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय..
ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ?
मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??— nitesh rane (@NiteshNRane) April 5, 2021
अनिल देशमुख यांनी राजीनाम्याच्या पत्रात नक्की काय म्हंटल
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडे ऍड. जयश्री पाटील यांच्या द्वारे दाखल याचिके मध्ये आज दि. 5एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहे. त्या अनुषंगाने मी मंत्री(गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी पत्रात म्हंटल आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page