हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्र सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असे नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षण हा केंद्राचा अधिकार आहे असं म्हंटल्यानंतर राणे आणि चंद्रकांत पाटील यांना कोर्टाचा हा निकाल मान्य आहे का असा सवाल करत टोला लगावला होता.
यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या राऊतांनी जशी सत्तेसाठी लोंबतेगिरी केली.. तीच जर मराठा आरक्षणासाठी केली तर.. आजचा अग्रलेख लिहायची वेळच आली नसती!! अस ट्विट नितेश राणे यांनी केले.
पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या राऊतांनी जशी सत्तेसाठी लोंबतेगिरी केली..
तीच जर मराठा आरक्षणासाठी केली तर..
आजचा अग्रलेख लिहायची वेळच आली नसती!! @rautsanjay61— nitesh rane (@NiteshNRane) August 6, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-
चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अनेकदा असे म्हणणे पडले की, ‘मराठा आरक्षणाचा तिढा फक्त भारतीय जनता पक्षच सोडवू शकतो. महाराष्ट्रात त्यांचे सरकार नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. राज्य सरकारचीच आरक्षणाबाबत अनास्था आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षण हा केंद्राचा अधिकार आहे. राज्यांचा तो अधिकार नाही असे बजावले. प्रश्न इतकाच आहे की, केंद्राने आज जो निकाल दिला तो चंद्रकांत पाटील, राणे वगैरे पुढारयांना मान्य आहे काय? असा सवाल करत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.