नितेश राणेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन; म्हणाले की त्यांनी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल, मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी.. किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..

एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ?? असं म्हणत नितेश राणे यांनी राज्यपालांना समर्थन देताना शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले-

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही भगसिंह कोश्यारींनी म्हंटल.