बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा,जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; राणेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबीय आणि ठाकरे परिवार यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही मवा नाही. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, नितेश राणे हे सातत्याने महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने शिवसेनेवर टीका करत असतात. एस टी कामगारांच्या संपात देखील त्यांनी सहभाग घेत मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका केली होती. त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेनंतर अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यावरून देखील राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

Leave a Comment